परिश्रम घेणार्‍या विद्यार्थ्यांनाआर्थिक, सामाजिक पाठबळाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

पाचोर्‍याचे उद्योजक तथा माजी आ. आर.ओ.पाटील यांचे प्रतिपादन

 
 
चाळीसगाव, 5 नोव्हेंबर - स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्यानंतर परीक्षार्थीचे कौतुक सोहळे होत असले तरी तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी आर्थिक, सामाजिक पाठबळाची व्यवस्था आणि त्यामागे असलेले अथक परिश्रम लक्षात घ्यायला हवे, अशी भावना ज्येष्ठ उद्योगपती व पाचोरा तालुक्याचे माजी आ. आर.ओ.पाटील यांनी येथे व्यक्त केले.
 
 
रविवार 4 नोव्हेंबर रोजी शहरातील राजपूत मंगल कार्यालयात चाळीसगाव गौरव सोहळा समितीच्या वतीने भारतीय पोलीस प्रशासन सेवेत प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेले यतिश देशमुख यांचा नागरी सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. आर. ओ. तात्या पाटील, सहकार महर्षी उदेसिंग पवार, आ. उन्मेश पाटील, माजी आ. राजीव देशमुख, बेटी बचाओ अभियानाच्या प्रदेश संयोजिका प्रा.डॉ.अस्मिता पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील जाधव, महेंद्र पाटील, तात्यासाहेब निकम, कुंदन शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, जेता एकादमीचे श्रीकांत मोरकर, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. सुनील राजपूत, डॉ. विनोद कोतकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, प्रमोद पाटील, मंगेश पाटील, जि.प.सदस्य भूषण पाटील, ईश्वर ठाकरे, पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे गटनेते राजेंद्र आण्णा चौधरी, नगरसेवक सुरेश स्वार, दीपक पाटील, भगवान राजपूत, प्रदीप राजपूत, प्रशांत पाटील, गीताबाई पाटील, शैलेंद्र रघुवंशी, सोनल साळुंखे, स्मिता पाटील, छाया पाटील, प्रतिभा पाटील, शर्मा, पृथ्वीराज चौधरी, सरदार राजपूत, प्रदीप राजपूत उपस्थित होते.
न्यूनगंडामुळे परीक्षा स्पर्धाकडे वळत नाही : यतिश देशमुख
 
स्पर्धा परीक्षांविषयीची भीती, न्यूनगंड आणि गैरसमज असल्याकारणाने सामाजिक घटकांतील उमेदवार स्पर्धा परीक्षांकडे फारसे वळत नाहीत. मात्र, देशाची प्रशासन प्रणाली, सामाजिक, आर्थिक विकास व नियोजनबद्ध वाढीसाठी युवकांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जायला हवे.
 
उद्याचा उज्ज्वल भारत घडविणार्‍या तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मेहनतीच्या बळावर यशोशिखर गाठायला हवे, असे सत्कारार्थी यतिश देशमुख यांनी मनोगतातून स्पष्ट करीत स्पर्धा परीक्षादरम्यान आलेले अनुभव कथन केले. मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
होतकरूंना मदत करणे गरजेचे : आ. उन्मेश पाटील
 
गरजू-होतकरु उमेदवारांचा शोध, त्यांच्या नेमक्या गरजा जाणून त्यांना सहकार्य व मदतीची नेमकी व्यवस्था करण्यासाठी अनेक अंगांनी काम करणे गरजेचे असल्याचे आ. उन्मेश पाटील यांनी सांगितले.
 
तालुक्यात गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सर्वतोवारी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांना तालुक्यातच रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसीच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष घालत आहे. एमआयडीसीच्या विस्तारासाठी उद्योजकांना सहाय्य केले जात असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
तरुण लोकसेवेकडे वळतात : मा.आ.राजीव देशमुख
 
आयआयटी किंवा मेडिकलच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांचा पगार देणार्‍या नोकर्‍या नाकारून आज अनेक तरुण लोकसेवेकडे वळत असून उच्चपदस्थ अधिकारी होत आहे. ही गोष्ट अंतर्मुख करणारी राहिली असल्याचे माजी आ. राजीव देशमुख यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@