सणासुदीत रेल्वेचे ब्लॉक घेणे थांबवाः शिवसेनेचे रेल्वेला साकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
 
भुसावळ, 5 नोव्हेेंबर - विभागात रेल्वे प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर ब्लॉक घेतले जात आहेत. परिणामी रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.
 
रेल्वेने ब्लॉक घेणे बंद करून गैरसोय थांबवावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे शनिवारी एडीआरएम मनोज सिन्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
रेल्वे प्रशासनाकडून विकासकामांच्या नावाखाली भुसावळ विभागातील अनेक पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जात आहेत. भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत, नागपूरकडे जाणार्‍या काही पॅसेंजर गाड्यांसह अनेक एक्सप्रेस गाड्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्यांसह अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होते.
 
ग्रामीण भागातील गोरगरिबांना पॅसेंजर गाड्यांमुळे सुविधा मिळते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर रेल्वे प्रशासनाने विकासकामे करावी, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.
 
संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्राचार्य विनोद गायकवाड, महिला आघाडी संघटक पूनम बर्‍हाटे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख नीलेश महाजन, बबूल बर्‍हाटे, सविता चव्हाण, योगेश बागुल, राकेश चौधरी, हेमंत बर्‍हाटे, सुरज पाटील, शेखर तडवी, विक्की चव्हाण आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@