रत्नापिंप्रीत पालखी सोहळा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
 
पारोळा, 5 नोव्हेंबर - श्री बालाजी महाराज रथोत्सवापाठोपाठ सोमवारी पालखी सोहळाही उत्साहात झाला. पालखी मिरवणुकीत शेकडो भाविकांनी आपला सहभाग नोंदविला.
 
सोमवारी सकाळी श्री बालाजी महाराज यांच्या महापूजेनंतर स्वामी पूर्णानंद महाराज यांच्या आशीर्वादाने श्रीमाणिक स्वामी आश्रमापासून पालखी सोहळ्यास दुपारी 4 वाजता सुरुवात झाली.
 
प्रथमतः दबापिंप्री, होळपिंप्री, रत्नापिंप्रीच्या गल्लोगल्लीत पालखी नेण्यात आली. शेकडो भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. हा पालखी सोहळा दुपारी चार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
 
विशेषत: पालखी सोहळ्यास महिलांची गर्दी दिसून आली. महिला भजने म्हणत होत्या तर तरुण लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय हो घोषणा देत होते.
 
मिरवणूक भजनी बँडच्या भजनाचा मधुर आवाज व वाजंत्रींच्या आवाजाने गावात धार्मिक वातावरणाने चैतन्य निर्माण झालेले दिसून आले. पालखी येणार्‍या प्रत्येक घरासमोर सडा, रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
  
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण मराठे, छगनराव पाटील, मयाराम पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, सरपंच प्रमिलाबाई भील, उपसरपंच सुरेश पाटील, तुकाराम पाटील, श्रीकृष्ण मित्र मंडळाचे कार्यकर्ते तिन्ही गावातील तरुण मंडळे आदींनी परिश्रम घेतले. गेल्या दोन दिवसांपासून रथोत्सव व पालखी सोहळा यामुळे रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
@@AUTHORINFO_V1@@