मराठी रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबारला नटराज पूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
 
नंदुरबार : मराठी रंगभूमी दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले.
5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
 
या दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार शहरातील नाट्यकर्मी, कलावंतांतर्फे शहरातील शिवाजी महाराज नाट्यगृह येथे एकत्र येऊन नटराज व तेथील रंगमंचाचे पूजन केले. नटराज पूजन अनिल पाटील, निलेश तवर यांच्या हस्ते करण्यात आले तर रंगमंच पूजन नाट्यकर्मी राहुल खेडकर यांच्या हस्ते झाले.
 
नंदुरबार शहरात लवकरच एकांकिका महोत्सव होणार असून त्या महोत्सवात सादर होणार्‍या एकांकिकेच्या संहितेचे पूजन नाट्यकर्मी मनोज सोनार व अहिराणी साहित्यिक विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 
नाट्यकर्मी रणजित राजपूत यांनी मराठी रंगभूमी दिनाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे आयोजन जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन समितीने केले होते.
 
 
यावेळी नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर, मनोज पटेल, राजेश जाधव, तुषार ठाकरे, पंकज पाठक, श्रीराम दाऊतखाने, विनोद चौधरी, पत्रकार निलेश पवार, पार्थ जाधव, राजेश जंजिरे आदी उपस्थित
होते.
@@AUTHORINFO_V1@@