'म्हाडा' करणार सामान्यांचे स्वप्न साकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |


 


सोलापूर: मुंबईनंतर आता पुणे, सांगली, चाकण, सोलापूर आणि कोल्हापूर याठिकाणीही म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्जाची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. अत्यल्प आणि सामान्य वर्गासाठी ही घोषणा अतिशय महत्वाची ठरेल. दरम्यान, मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांची घोषणा दिवाळीनिमित्त करण्यात आली. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया ५ नोव्हेंबरपासून सुरु झाल्या आहेत. त्याची घोषणा १६ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

"मुंबईनंतर आता पुण्यातील २८ ठिकाणांवरील म्हाडाच्या घरांची घोषणा १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाणार असून त्याचवेळी सांगलीतील घरांसाठीही ऑनलाईन अर्ज मागविले जातील. त्याठिकाणी अल्प (६ लाख) आणि अत्यल्प (३ लाख) उत्पन्न असणाऱ्यांना १२ ते २० लाखांपर्यंत घरे मिळणार आहेत. सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील घरांची कामे जूनपर्यंत पूर्ण होतील." अशी माहिती अशोक पाटील यांनी दिली.

 

अशी असेल म्हाडाच्या घरांची स्थिती

 

मुंबई - १३८४

पुणे - ७५०

सांगली - ८८

चाकण - २०००

सोलापूर - ९६

कोल्हापूर – ६७

 

संबंधित बातमी वाचण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@