मातीशी नातं असलेले यशस्वी होतात : आ. भोळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

किल्ला स्पर्धेत विजयदुर्ग, प्रतापगड, काल्पनिक किल्ला ठरला प्रथम


 
जळगाव, 5 नोव्हेंबर - मातीशी खेळणार्‍या माणसांची मातीशी नाळ जुळते आणि अशा माणसांचे मातीशी नाते जुळते. मातीशी नाळ जुळलेलेच जमिनीवर घट्ट पाय ठेवून यशस्वी होतात, असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले. आशा आणि युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित किल्ला बनवा स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
 
याप्रसंगी व्यासपीठावर अनुभूतीच्या संचालिका निशा जैन, रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या डॉ. प्रीती अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, शिल्पा चोरडिया, आर्किटेक्ट निनाद कुळकर्णी, विराज कावडिया, अमित जगताप आदी उपस्थित होते.
 
प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेतील सहभागी दर्शन मराठे, आरती चौधरी तसेच परीक्षकांच्या वतीने आर्किटेक्ट निनाद कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. निशा जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न आवश्यक व महत्त्वाचा असल्याचे म्हटले. दिलीप तिवारी यांनी पंतप्रधान, आमदार, महापौर आणि मंचावरील विविध संस्थांचे प्रमुख हे आधुनिक किल्लेदार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना विधिमंडळाचा किल्ला दाखवावा, असे आवाहन त्यांनी आ. भोळे यांना केले आणि त्यांनी तत्काळ होकार दिला.
 
दोन्ही संस्थांच्या कार्याचे आणि स्पर्धेचे सर्वांनी विशेष कौतुक करुन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. सूत्रसंचालन व्यवस्थापिका सुजाता बोरकर यांनी केले तर आभार अमित जगताप यांनी मानले.
 
 
किल्ला बनवा स्पर्धेत 11 ऐतिहासिक किल्ल्यांसह 4 काल्पनिक, एक कॉर्पोरेट किल्ला बनविण्यात आला आहे. ऐतिहासिक किल्ल्यातही तीन संघांनी प्रत्येकी प्रतापगड, रायगड व सिंधुदुर्ग किल्ला बनविला आहे.
 
दोन संघांनी प्रत्येकी शिवनेरी, सिंहगड, विजयदुर्ग व राजगड साकारला आहे. यासह मुरुड जंजिरा, तोरणा, पन्हाळा, देवगिरी किल्लाही साकारला आहे. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी साकारलेले किल्ले अधिक सुबक, कल्पक व दर्जेदार असल्याचे लक्षात येते. यशस्वितेसाठी मधुकर पाटील, धीरज पाटील, प्रदीप पवार, वसुधा शिगवण, माधुरी पुंडे तसेच युवाशक्तीचे संदीप सूर्यवंशी, मनजीत जांगीड, पीयूष हसवल, विनोद सैनी, भवानी अग्रवाल, शिवम महाजन, आकाश वाणी, भूषण सोनवणे, मितेश गुजर आदींनी सहकार्य केले.

किल्ला बनवा स्पर्धा निकाल

 
शालेय छोटा गट ः प्रथम ः विद्या इंग्लिश स्कूल (विजयदुर्ग), द्वितीय - बालनिकेतन विद्या मंदिर (राजगड), तृतीय - राज सोनवणे व संघ (रायगड ), उत्तेजनार्थ - बालनगरी संघ (कॉर्पोरेट किल्ला) व बालमंच संघ (काल्पनिक किल्ला)
 
शालेय मोठा गट ः प्रथम ः श्रीवरद सुतार व संघ ( प्रतापगड), द्वितीय - महाराणा प्रताप विद्यालय (प्रतापगड), तृतीय - कोमल चौधरी व संघ (रायगड) उत्तेजनार्थ - प्रगती विद्या मंदिर (सिंहगड) व जिजामाता विद्यालय (सिंहगड)
 
खुला गट ः प्रथम ः चेतन भोपळे व संघ (काल्पनिक किल्ला), द्वितीय - गौरव देवरे व संघ (देवगिरी किल्ला), तृतीय - भाग्येश राणे व संघ (रायगड) उत्तेजनार्थ - ऋषिकेश गुरव व संघ (प्रतापगड)
 
वेशभूषा स्पर्धा ः प्रथम ः शंभूराजे शिंदे (शिवाजी महाराज), भरत सोनार (मावळा), संस्कृती पवनीकर, रमा पुंडे व आरती चौधरी (मराठमोळी स्त्री).
@@AUTHORINFO_V1@@