धरणगावच्या जवानाचा जम्मूत मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

उद्या शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार


 
 
धरणगाव : येथील जितेंद्र मोहन पानपाटील वय (38) कनिष्ठ लिपिक म्हणून इंडियन आर्मीत जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते. त्यांचा 5 नोव्हेंबर रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
 
30 ऑक्टोबर रोजी ड्यूटीवर असताना भोवळ येऊन पडल्याने 31 ऑक्टोबर रोजी त्यांना दरवाजा तोडून बाहेर काढले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
30 रोजी ड्यूटीवरून रूमवर गेल्यावर बाथरूममध्ये रात्री 1 ते 2 दरम्यान तो भोवळ येऊन पडले. ही बाब सहकार्‍यांच्या सकाळी लक्षात आली. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.
 
श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केल्यावर त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचे समजले. तद्नंतर हेलिकॉप्टरने त्याला उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु, 5 रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली.
 
 
त्यांचे पार्थिव उधमपूरहून मुंबई तेथून धरणगावला आणले जाईल. 7 रोजी सकाळी साईबाबानगर एरंडोल रोड, धरणगाव येथून अंत्ययात्रा निघेल. त्यांचा पश्चात आई, वडील, एक बहीण, दोन भाऊ, पत्नी संगीता, मुलगी तनिष्का (10), मुलगा तनिष्क (3) असा परिवार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@