पाळधीजवळील हॉटेलमध्ये वेटरला मारहाण; गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
पहूर, ता.जामनेर - येथून जवळच असलेल्या जय भोले बाबा हॉटेलमधील वेटरला मारहाण करून हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी 12 जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
जळगाव रोडवरील पाळधीजवळच जय भोले बाबा ढाब्यावरील वेटरला मारहाण करून हॉटेलचे नुकसान केले. ही घटना रविवार 4 रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली.
 
याप्रकरणी पंढरी झुंजारे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी दत्ता दिनकर पाटील, पंढरी दिनकर पाटील, विशाल धनराज पाटील, समाधान पाटील, सोपान पाटील, गोकुळ पाटील, विलास पाटील, प्रदीप कोळी, राजू चौधरी, प्रमोद पाटील, चक्रधर पाटील, किरण कोळी सर्व रा. मोहाडी ता. जामनेर यांच्याविरुद्ध दाखल झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@