भाजप मुंबई प्रदेश उपाध्यक्षांचा स्तुत्य उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |


 


मदरसामधील सहा गरीब मुलांना घेतलं दत्तक


मुंबई : भाजपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम यांचा स्तुत्य उपक्रम सध्या चर्चेचा विषय बनतो आहे. आजम यांनी मदरसामधून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सहा मुलांना दत्तक घेतलं आहे. तसेच ते चार वेळा हजला देखील जाऊन आले आहेत.

 

मालाडमधील नूर मेहर चॅरिटेबल ट्रस्टच्या जामिया ताजविदूल कुराण आणि नूर मेहर स्कूल या मदरशांमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम आजम यांनी या सहा मुलांना दत्तक घेत असल्याची घोषणा केली. या सहाही विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च आजम उचलणार आहेत.

 

आजम हे रा. स्व. संघांचे स्वयंसेवक असल्याचे देखील बोलले जात आहे. संघाच्या गणवेशातील त्यांचा फोटो देखील व्हायरल होत आहे. मात्र यावर आजम यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी संघांचा स्वयंसेवक नसून मित्रांच्या आग्रहास्तव संघाच्या विजयादशमी संचलनमध्ये सहभागी झालो होतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@