बंदिस्त नाट्यगृहासाठीगांधी पुतळ्याजवळ ‘नटराज’ पूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

भुसावळमध्ये रंगकर्मींमध्ये संतापाची लाट

 
भुसावळ - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळातील बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गांधी पुतळा चौकात रंगकर्मींनी एकत्र येत नटराज पूजन केले.
 
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुनंदा औंधकर, रमाकांत भालेराव, विरेंद्र पाटील, नारायण माळी, धनराज कुंवर, तुषार जोशी, मयूर सुरवाडे, अजय पाटील, रितेश वानखडे, खुशाल निंबाळे आदी उपस्थित होते.
  
तत्पूर्वी मराठी रंगभूमी दिनानिमित्त भुसावळातील स्नेहयात्री प्रतिष्ठानने सेंट मेरी इंग्लिश स्कूल, भुसावळ येथे सकाळी 10 वाजता ज्येष्ठ व नवोदित रंगकर्मींच्या स्नेहमेळाव्याचे व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
 
या मेळाव्यात नाट्यगृहाच्या मागणीचे निवेदन देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्ष रमण भोळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर शहरातील एकूण 40 रंगकर्मींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
याप्रसंगी जेष्ठ रंगकर्मी अरुण मांडाळकर, डॉ. दिलीप देशमुख, अनिल कोष्टी, पंकज जोशी, प्रकाश चौधरी, संजीवनी यावलकर, संजय यावलकर, आशा पाटील यांच्यासह अनेक नवोदित रंगकर्मींची उपस्थिती होती.
@@AUTHORINFO_V1@@