पर्यावरणपूरक आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

चाळीसगावात वसुंधरा फाउंडेशनतर्फे बालगोपालांचा मेळा


 
चाळीसगाव, 5 नोव्हेंबर - येथील वसुंधरा फाउंडेशनतर्फे बालगोपालांसाठी चित्रकार धर्मराज खैरनार यांच्या मार्गदर्शनात कै.सौ.सुवर्णाताई उद्यानात पर्यावरणपूरक आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी मंचावर डॉ. उज्ज्वला देवरे, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार, ज्योती मोरे, देवेन पाटील, धर्मराज खैरनार, सादिक शेख, योगेश कोठावदे, रुपाली चौधरी, अमोल येवले, सागर मोरे, अमोल रोजेकर, तेजल नानकर, मनोज पाटील मंचावर उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात स्व. केकी मूस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
 
डॉ. उज्ज्वला देवरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत दिवाळीत बाजारात मिळणार्‍या प्लास्टिकपेक्षा आपल्या पाल्याने साकारलेला आकाश कंदील घरासमोर लावल्यास अधिक आनंद होईल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आदर वाढेल.
 
दिवाळीला आवश्यक असणार्‍या आकाश कंदिलाचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे प्रास्ताविक चित्रकार धर्मराज खैरनार यांनी केले. धरती पवार प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरणपूरक आकाश कंदीलच सर्वांनी वापरावेत, यासाठी जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला.
 
 
विद्यार्थ्यांनी 210 पर्यावरणपूरक आकाश कंदील बनविले. प्रशांत चौधरी, प्रमोद शिंपी, दीपक देशमुख, खुशाल पाटील, योगेश माळी, सुजित पाटील, मनोज पाटील, बापूसाहेब खैरनार, महेंद्र जाधव, निलेश काकडे उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले.
 
 
आकाश कंदील बनविण्याचे यांनी दिले प्रशिक्षण
 
कार्यशाळेत पर्यावरणपूरक आकाश कंदील कसा तयार करायचा, याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शक कलाशिक्षक धर्मराज खैरनार, सादिक शेख, योगेश कोठावदे, रुपाली चौधरी, अमोल येवले, सागर मोरे, अमोल रोजेकर, तेजल नानकर यांनी कागदापासून अतिशय सहजरीत्या वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील बनवण्यास शिकवले.
@@AUTHORINFO_V1@@