जैविक शेतीची कास धरावी : देशपांडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

पहूरला शेतकरी मार्गदर्शन मेळावा


 
पहूर, ता. जामनेर - जैविक शेतीतून समृद्ध भारत घडत असून रासायनिक फवारण्या, खतांपेक्षा जैविक खतांचा वापर शेतकरी बांधवांनी करायला हवा तसेच जैविक शेतीची कास धरावी, असे प्रतिपादन इनफ्लक्स ग्रुपचे संचालक संजय देशपांडे (पुणे) यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
 
 
रासायनिक शेतीमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून जैविक शेतीच आज शेतकर्‍यांना फायदेशीर आहे, असेही ते म्हणाले. प्रारंभी अतिथींचे स्वागत करण्यात आले.
 
यावेळी रामचंद्र वानखेडे, समाधान पाटील, आनंदा पवार, प्रवीण पाटील, राजधर पाटील, प्रदीप सोनार, ज्ञानदेव करवंदे, अमृत वानखेडे यांच्यासह पहूर परिसरातील 30 प्रगतिशील शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
  
प्रास्ताविक अनिल पाटील (पाचोरा) यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश कचरे यांनी केले. आभार रामचंद्र वानखेडे यांनी मानले. यशस्वितेसाठी गजानन सोनवणे, दीपक जाधव, जयंत घोंगडे, डॉ. संभाजी क्षीरसागर, विकास उबाळे, प्रकाश भिवसने, जगदीश पवार, भिका चौधरी, अनिल घोंगडे, जय भिवसने, ज्ञानेश्वर चौथे यांच्यासह आयोजकांनी सहकार्य केले.
@@AUTHORINFO_V1@@