रंगला उत्सव 'दिवाळी पहाट'चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |


 


ठाणे: दिवाळीचा पहिला दिवस आणि दिवाळी पहाट याची ठाणेकर आणि डोंबिवलीकर अतिशय उत्साहाने वाट पाहतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यातील राम मारुती रोड, तलावपाळी आणि डोंबिवलीतील फडके रोड तरुणाईच्या रंगात रंगून गेले होते. ढोल ताशे, डीजे, ब्रास बँड अशा साऱ्यांचा आनंद तरुणाईने लुटला. नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली. प्रत्येक जण पारंपारिक वेशभूषेत आले होते आणि आपल्या मित्र मैत्रिणीला शुभेच्छा देऊन सणाचा आनंद व्यक्त करीत होते. ठिकठिकांणी सेल्फी वेड्या तरुणाईंसाठी सेल्फी पाँईंटही उभारला होता.

 
 

गेल्या अनेक वर्षांपासून नरक चतुर्दशीला राम मारुती रोड, तलावपाळी आणि फडके रोड अशा ठिकाणी सर्व तरुणांनी एकत्र येण्याची जणू परंपराच झाली आहे. यावर्षीही ही परंपरा तरुणांनी राखली. सकाळी ६ वाजल्यापासून राम मारुती रोड, तलावपाळी, गोखले रोड आणि फडके रोड यांठिकाणी तरुणाईने येण्यास सुरूवात केली. सकाळी ८ वाजता ही ठिकाणे गर्दीने तुडुंब भरली होती. अनेक ठिकाणी संगीतमय कार्यक्रम तर कुठे डीजे, रॉक बँडचा जल्लोष असे चित्र दिसत होते. ढोल ताशांच्या गजरात तरुणाई थिरकताना दिसली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

 


 
 

तरुणांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी अनेक ठिकाणी राजकारण्यांनीही हजेरी लावली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आ. संजय केळकर, भाजपच्या अ‍ॅड. माधवी नाईक, सभागृह नेते नरेश म्हस्के, आ. निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी तरुणाईला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 
  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@