खव्याची मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी विक्रेत्यांनीही करावेत प्रयत्न


 
जळगाव, 5 नोव्हेंबर - शहरात दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी होते. यात प्रामुख्याने खव्याच्या मिठाईचा समावेश असतो. सध्या काही ठिकाणी सदोष मिठाई मिळत असल्याची तक्रार होत असल्याने ग्राहकांनी योग्य काळजी घेऊन विश्वासार्हता दुकानातूनच खरेदी करण्याची गरज आहे.
 
 
दिवाळीत भेटवस्तू देण्यासाठी, तसेच लक्ष्मीपूजनाला पूजेसाठी मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी केली जाते. यात खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा प्रामुख्याने समावेश असतो.
 
खवा नाशवंत असल्याने त्यापासून तयार केलेल्या पदार्थांबाबत मिठाई उत्पादक आणि ग्राहक या दोघांनीही पुरेशी काळजी घेणे आवश्यक असते.अन्यथा अशी मिठाई खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
 
 
ग्राहक विश्वासार्हता व नामांकित दुकानातून खरेदीला करण्यालाच प्राधान्य देतात. ‘विश्वासार्हता’प्राप्त करण्यासाठी व्यापार्‍यांनाही कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
 
ग्राहकांनी दिवाळीत खव्याच्या मिठाईची खरेदी करताना त्यावरील उत्पादन तिथी, एक्सापायरी डेट, दर्जा, दुकानातील स्वच्छता व ग्राहकांचे आरोग्य, वस्तूंचा ताजेपणा, खरेदी केल्याचे बिल आदी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्याव्यात. खराब मिठाई खाण्यात आल्यास फूड पॉयझनिंगचा धोका असतो.
 
 
मिठाई उत्पादकांनीही आपल्या उत्पादनात कोणताही दोष राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असते. काही मिठाई विक्रेत्यांनी ग्राहक सेवेसाठी विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर आलेल्या तक्रारींची दखल त्यांनी घ्यायला हवी. जेणेकरून ग्राहक व दुकानदारांमधील विश्वासाचे नाते टिकून राहील.
 
 
 


सध्या एफडीए काय करते ?

दिवाळीच्या दिवसात अन्न व औषध प्रशासनाद्वारे मिठाईच्या दुकानांवर तपासणी करून खाद्यपदार्थात वापरण्यात येणारा मावा (खवा) व इतर घटक पदार्थ भेसळयुक्त आहेत का? हे पाहिले जाते.
 
त्यात यापूर्वी अनेकांवर कारवाई झाली आहे. ग्राहकांचे आरोग्य आणि जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांवरही आहे, हे त्यांनी विसरू नये.
 
@@AUTHORINFO_V1@@