चेअरमनसह वसुली अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |
 

संतोषी माता मर्चंट्स को ऑप.क्रेडिट सोसायटी लि : बनावट स्वाक्षरीने बनवला खोटा 101 चा दाखला



भुसावळ, 5 नोव्हेंबर - शहरातील संतोषी माता मर्चंट्स को ऑप.क्रेडिट सोसायटी लि.चे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे यांच्यासह पतसंस्थेचे वसुली अधिकारी प्रशांत लक्ष्मण भारंबे (निवृत्तीनगर, वृंदावन पार्क, भुसावळ) यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली.
 
याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक निबंधकांसह तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सहाय्यक निबंधकांची बनावट स्वाक्षरी करून 101 चा दाखला बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकाने ही कारवाई केली.
 
या प्रकरणातील तक्रारदार रवींद्र भोळे यांनी पुराव्यांसह स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेसह दिल्ली ईडीकडे तक्रार केली होती. दरम्यान, भोळे यांनी या पतसंस्थेच्या फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केली असून त्यातून अनेक गैरप्रकार उघड होतील, असा दावा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
 
भोळे यांच्या पत्नी संगीता भोळे यांनी या पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. मात्र कर्ज वसुलीसाठी कुठलीही नोटीस न देता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे, त्यांचे संचालक मंडळ, वसुली अधिकारी प्रशांत भारंबे व तत्कालीन सहाय्यक निबंधक गिरीधर अहिरे आदींनी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातून संगनमत करून गुन्हेगारी कट रचत स्वःहस्ताक्षरात 101 चा खोटा दाखला बनवला होता. चौकशीदरम्यान 101 चा दाखला बनावट बनवला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी तक्रार दिल्यानंतर सोमवार, 5 रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अनेक गैरप्रकार बाहेर पडतील
 
या घोटाळ्यात सहकार विभागाचे अधिकारीही सहभागी असल्याने त्यांच्या चौकशीची मागणी करू. शिवाय संस्थेच्या स्थापनेपासून फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केली असून ती मान्य झाली आहे. महाराष्ट्रातील एकमेव तामिळनाडूची संस्था ही ऑडिट करते शिवाय त्यासाठी काही रक्कम भरावयाची असून ती भरल्यानंतर अनेक गैरप्रकार बाहेर पडतील, असा दावा भोळे यांनी केला.
@@AUTHORINFO_V1@@