दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे ७ हजार कोटींची मागणी : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |



उस्मानाबाद:राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही सात हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत. याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे. तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होऊ शकेल,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उस्मानाबादमध्ये दिली.

 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी उस्मानाबादात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही ऑक्टोबरअखेर दुष्काळ जाहीर केला. आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली़ पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत. यासाठी निधी कमी पडू देणार नाही.

 

कोणत्याही भागात अन्नधान्याची टंचाई भासल्यास तेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. “त्याचबरोबर, राज्यात मागील सरकारच्या काळात झालेल्या सरकारच्या सिंचन घोटाळ्याची कारवाई सुरूच आहे. याप्रकरणी आजवर २५ एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@