जिल्ह्यात चाराटंचाईवर मात करण्यासाठी वैरण बियाण्यांसाठी 55 लाखांचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

टंचाईग्रस्त परिसरातील शेतकर्‍यांना मिळणारा दिलासा

 
जळगाव, 5 नोव्हेंबर - जिल्ह्यात चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत वेैरण बियाणे वाटप व पशुधन विमा योजनेसाठी 55 लाख 48 हजारांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश इंगळे यांनी दिली.
 
योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वैरण बियाणे देण्यात येणार आहे. संभाव्य चाराटंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
टंचाईग्रस्त तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 नोव्हेंबर असेल. या योजनेअंतर्गत मका, ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
 
बियाणे उपायुक्त पशुसंवर्धन वितरित करणार असून निवड समिती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती निवड करणार आहे.

टंचाईग्रस्त तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी ‘वैरण बियाणे, खते वितरण’योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यातील संभाव्य चाराटंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता वैरण बियाणे व खते वितरण करण्यात येत आहे.
 
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त तालुक्यातील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालक, शेतकरी यांना वैरण बियाणे व खते वितरण करणेसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.
 
यासाठी टंचाईग्रस्त तालुक्यातील शेतकर्‍यांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी संपर्क साधून तालुकास्तरावर 29 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी केले
आहे.
@@AUTHORINFO_V1@@