‘जिल्हा बँकेवरील आरोप खोटे’ : आ. किशोरअप्पा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 5 नोव्हेंबर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा परिषदेचे सीईओ आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या खात्यातून 5 कोटी रुपये परस्पर वर्ग केल्याच्या दाव्यात तथ्य नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही झाली असल्याचा दावा बँकेचे उपाध्यक्ष आ. किशोरअप्पा पाटील यांनी केला आहे. सोमवारी बँकेत झालेल्या पत्ररिषदेत ते बोलत होते.
 
जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ शिवाजी दिवेकर यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांना माहिती देताना जिल्हा बँकेने परस्पर पाच कोटी रुपये वर्ग केले असून, याप्रकरणी बँकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे सांगितले होते.
 
या पार्श्वभूमीवर किशोरअप्पा पाटील यांनी बँकेची बाजू मांडली. ते म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसारच बँकेने पाच कोटी रुपयांची रक्कम न्यायालयाच्या खात्यात वर्ग केली आहे.
 
न्यायालयाने नोटीस देऊनही जि.प.ने त्याकडे दुर्लक्ष केले. भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना द्यायच्या भरपाईचे हे प्रकरण आहे. न्यायालयाने जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांना बेअदबीच्या कारवाईचा इशारा दिला होता.
 
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बँकेने कार्यवाही केली आहे. बँकेवर आरोप करणार्‍या बातम्या पेरण्यात आल्या, त्या चुकीच्या आहेत असेही ते म्हणाले. याप्रसंगी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व अधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@