भुसावळला निधी कमी पडणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
माजी मंत्री एकनाथराव खडसेंची रस्ता भूमिपूजनप्रसंगी ग्वाही
 
भुसावळ, 4 नोव्हेंबर- केंद्रासह राज्यात आणि शहरातही भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करू, अशी ग्वाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. शनिवारी शहरातील 45 वर्षांपासून रखडलेल्या रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
यावेळी खा. रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे उपस्थित होते. पुढे बोलताना खडसे म्हणाले की, अमृत योजनेमुळे 25 वर्ष पाण्याची चिंता मिटेल. तसेच सात वर्ष कराराच्या एलईडी दिव्यांमुळे पालिकेचा वीज बिलासह मेंटेनन्सचा खर्च वाचणार आहे.
 
एकाच वेळी विभागातील सात पालिकांचे करार केल्याने कामास दिरंगाई होत असल्याचेही खडसेंनी सांगितले. तसेच खा. खडसे यांच्या निधीतून शहरातील प्रमुख चौकात 100 हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री खडसे यांनी दिली.
 
 
कार्यक्रमाला प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, अ‍ॅड. बोधराज चौधरी, मुकेश पाटील, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील, प्रकाश बतरा, सतीश सपकाळे, दीपक धांडे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वसंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मौर्य, शाखा अभियंता एस. वाय. कुरेशी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@