रत्नापिंप्रीत बालाजी रथोत्सवाचा उत्साह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
हजारो भाविकांची मांदियाळी; ‘लक्ष्मी रमणा गोविंदा’च्या नामघोषाने परिसर दुमदुमला
 
 
 
पारोळा, 4 नोव्हेंबर - लक्ष्मी रमणा गोविंदाच्या जयघोषात बालाजी महाराजांचा रथोत्सव रविवारी जल्लोषात साजरा झाला. जवळपास नऊ तास तीनही गावातून ही मिरवणूक निघाली.
 
 
रथोत्सवानिमित्त आज स्वामी माणिक स्वामी पूर्णानंद महाराज यांच्या आशीर्वादाने मूर्ती पूजा, आरती व अभिषेक करून रत्नापिंप्रीसह, होळपिंप्री, दबापिंप्री या गावातून रथ मिरवणूक काढण्यात आली.
 
 
श्री बालाजी महाराज यांची पूजा महाअभिषेक, आरती पूजा, पाच यजमान त्यात जि.प.सदस्य हिंमत पाटील, निंबा दुसाणे (पारोळा), अंकुश भागवत (दबापिंप्री), भटू पाटील (रत्नापिंप्री), दिलीप सोनकुळे (पारोळा) यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून दुपारी 12 वा. लक्ष्मी रमणा गोविंदाच्या जयघोषात मिरवणुकीस प्रारंभ झाला.
 
 
महापूजेची सूत्रे सोमनाथ लोकाक्षी व जलेश लोकाक्षी, रामकृष्ण मराठे यांनी सांभाळली. आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, जि. प. सदस्य हिंमत पाटील यांच्यासह सामाजिक, प्रशासन विभागातील अनेक मान्यवरांनी सहभागी होऊन बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
 
 
रथाचे मानकरी नंदू धनगर, चंद्रकांत पाटील, हर्षल भदाणे, आनंदा बिरारी, निखिल पाटील, राहुल मनोरे, दुर्गादास मनोरे कांतीलाल चिंचोरे होते.रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान पाटील यांना देण्यात आला. ढोल-ताशांच्या लेझीम पथकामुळे रथोत्सवात चैतन्य निर्माण झाले होते. तरुणाई ढोल- ताशांच्या तालावर बेधुंद नाचत होती.
 
 
पालखी सोहळा आज
 
सोमवार 5 रोजी दुपारी 2 वाजता श्री माणिक स्वामी आश्रमातून श्रींचा पालखी सोहळा सुरू होणार असून पालखी काना कोपर्‍यातून प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@