श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयातदिवाळी सणानिमित्त निवासी शिबीर उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - दीपावलीचा दीपक नैराश्य घालवून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा स्वानंद आणि स्वावलंबन विकसित करण्यासाठी मंगलमय दिवाळी व निवासी शिबीर शनिवार 3 रोजी श्रवण विकास मंदिर कर्णबधिर शाळेत आयोजित करण्यात आले.
 
दीपावलीच्या पाचही दिवसांचे महत्त्व शिक्षिका कल्पना तांबट यांनी प्रोजेक्टरद्वारे दाखविले तसेच मुलांनी फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला.
 
दुपारच्या निवासी सत्रात विद्यार्थ्यांच्या वर्गवार विविध मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे शालेय परिसरात किल्ले बनविले व मुलींनी विविध आकर्षक रांगोळ्या काढल्या. विद्यार्थ्यांनी स्वत: आकाश कंदील आणि पणत्यांवर रंगकाम करून शालेय परिसरात रोषणाई केली व शाळेची इमारत दीपोत्सवाने सजली.
 
 
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दी वैद्यनाथ अर्बन को.ऑप. बँक लि. जळगाव शाखेचे कर्मचारी अविनाश गंगणे, भरत मुंडे, राजन सोनवणे, स्वप्निल कोतवाल, जयेश वाणी, गोपाल बुंदेले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
 
 
विद्यार्थ्यांनी मूक अभिनय, नाट्यछटा, नृत्य इ. अंगीभूत कौशल्य दाखवून मनोरंजन केले. रात्री बोधपर माहितीपट दाखविण्यात आला. पहाटे लवकर उठून पक्षी निरीक्षणाचाही आनंद घेतला.
 
 
निवासी शिबिराच्या माध्यमातून कर्णबधिर विद्यार्थ्यांना स्वावलंबन, स्वयंशिस्त, आज्ञापालन आणि सहकार्याने राहण्याचा अनुभव देण्यात आला. या उपक्रमाकरिता पद्माकर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षिका अश्विनी कुलकर्णी यांनी तर सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@