दिवाळीत एटीएममध्ये खडखडाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - जळगाव शहरात दिवाळीसारखा सण असतानाही याचे बँकांना काही देणघेण नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही एटीएम हे बंदावस्थेत दिसून येत आहेत तर काही एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ होताना दिसून येत आहे.
 
 
सण आल्यावर नेहमीच नागरिकांची गर्दी ही बँकेच्या एटीएमवर दिसून येते. काही साहित्य खरेदीसाठी नागरिक हे पैशांअभावी बँक एटीएमवर जाऊन पैसे काढण्याला पसंती देतात. परंतु, बँक एटीएम बंद किंवा त्यात पैसे नसल्याने नागरिकांची फरपट होताना तरुण भारतच्या सर्वेक्षणात दिसून आली.
 
शहरात महत्त्वाच्या ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांना दुसर्‍या बँकेच्या ठिकाणी जाऊन पैसे काढावे लागत असल्याने त्यांना बँकांच्या नियमाप्रमाणे आर्थिक दंडही बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे. दिवाळीसारख्या सणाला जर ही परिस्थिती होत असेल तर बँकांचे व्यवहार कसे आहेत, हे वेगळेे सांगायला नको.
 
 
सायंकाळी शहरातील प्रत्येक एटीएमवर नागरिक हे जात असताना ते बंद वा त्यात पैसे नसल्याने त्यांचा हिरमोड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी त्यांना साहित्य खरेदी न करता पुन्हा माघारी फिरावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, जे एटीएम सुरू आहेत त्यावर नागरिकांची गर्दी होत असल्याचेही दिसून आले
आहे.
@@AUTHORINFO_V1@@