देशभक्तांच्या स्मरणाने रसिक भारावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |

 
जळगाव ः - मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला परिवर्तन जळगावनिर्मित, संगीता पवारलिखित जननी जन्मभूमी हे देशभक्तीपर नाटक सादर करण्यात आले. आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या वीर पुत्रांच्या मातांनी आपल्या पुत्राबद्दलच्या भावना नाट्यरूपात सादर करून देशभक्तीसोबतच त्या वीरांचे बलिदान, त्यांचा त्याग आणि त्यांची आठवण करून दिली.
 
 
स्वातंत्र्य सैनिक पद्मावती जोशी आणि कॅप्टन मोहन कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून परिवर्तनने देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करत रंगभूमीचा आणि देश प्रेमाचा संबंध जोडत असल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी एक नवीन प्रवाह जळगावात सुरू केल्याचे मत कॅप्टन कुलकर्णी यांनी काढले.
 
 
यानंतर चाफेकर, शिरीष कुमार, खुदीराम बोस, अश्फाक उल्ला, भगतसिंग आणि विष्णू गणेश पिंगळे या सहा वीरांचे स्मरण त्यांच्या मातांनी एकपात्री नाटक करून रंगभूमीवर सादर केले. सूत्रसंचालन प्रतिभा जंगम तर कार्यक्रम यशस्वितेसाठी होरिलसिंग राजपूत, योगेश चौधरी, योगेश पाटील, हर्षदा कोल्हटकर, भूषण गुरव आदींनी परिश्रम घेतले.

अप्रतिम सादरीकरण
 
संगीता पवार, मंजूषा भिडे, सोनाली पाटील, प्रतिभा देशकर, वैदेही नाखरे, केतकी जोशी, स्नेहा एकतारे या कलावंतांनी अप्रतिम सादरीकरण करून रसिकांना खेळवून ठेवले. स्त्री कलावंतांनी केलेल्या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला.
@@AUTHORINFO_V1@@