रा.स्व.संघ आरोग्य भारतीतर्फे‘किल्ले बांधणी’ विषयावर शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरोग्य भारतीतर्फे 4 रोजी इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पारंपारिक मैदानी खेळ आणि किल्ले बांधणी या विषयावर शिबीर घेण्यात आले.
 
नूतन मराठा विद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊ वाजेपासून नोंदणी सुरू करून दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबीर सुरू होते. शिबिरास परीक्षक म्हणून चित्रकलेचे शिक्षक सुशील चौधरी, वैशाली पाटील उपस्थित होते. 
 
 
शिबिरात विद्यार्थ्यांनी प्रतापगड, पन्हाळा, तोरणा, जंजिरा, रायगड लोहगड व सिंहगड अशा विविध शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून आपले कलेचे प्रदर्शन केले.
 
शंभूराजे साप्तहिक शाखा महाबळ, वीर बाजीराव पेशवा शाखा पिंप्राळा, पराक्रमी शिवराय रिंगरोड शाखा, प्रताप आदित्य संयम शाखा यांनी अनुक्रमे बक्षिसे पटकावलीत. परीक्षकांनी मनोगत व्यक्त केले. शहराचे शहर संघचालक डॉ. विलास भोळे यांनी समारोप केला.
 
 
पाचोर्‍यात प्राथमिक शिक्षा वर्ग
 
पाचोर्‍यात 11 ते 18 नोव्हेंबरला प्राथमिक शिक्षा वर्गाची माहिती उमेश सोनवणे यांनी दिली. डॉ. रितेश पाटील, निखिल तिवारी, भानुदास माळी, योगेश इंगळे, सुश्रूत मुळे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था बघितली.
@@AUTHORINFO_V1@@