लूटप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
डॉक्टर महिलेला गळ्यावर चाकू ठेवून केली होती चोरी
जळगाव, 4 नोव्हेंबर - नारायणी सोसायटीतील डॉक्टर महिलेचे हातपाय बांधून करण्यात आलेल्या लूटप्रकरणी दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तपासात संशयित जाकीर पीरन खाटीक याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल मिळाला आहे.
 
 
घरात एकट्या असलेल्या डॉक्टर महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे हातपाय बांधले. त्यानंतर गळ्यावर चाकू ठेवून पाच लाखांची रोकड व 25 हजारांची सोन्याची अंगठी असा ऐवज तीन चोरट्यांनी लांबवला. 29 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजता रिंगरोड परिसरातील नारायणी सोसायटीत ही घटना घडली होती
 
. चोरट्यांनी कपाटातील सुटकेसमधून पाच लाख रुपयांची रोकड व डॉ. अचल पाटील यांच्या हातातील 25 हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरट्यांनी काढून घेतली. याप्रकरणी डॉ. अचल यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठला गुन्हा दाखल झाला.
 
तपासात परिसरात इतर इमारतींवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासातून जाकीर पीरन खाटीक (वय 30, रा.बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव), चेतन भागवत सूर्यवंशी (वय 28, रा. कोल्हे हिल्स परिसर, वाघनगर) यांना अटक केली होती.
 
 
दरम्यान, जाकीर पीरन खाटीक याच्या राहत्या घरातून दोन लाख 25 हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे. उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायमूर्ती साठे यांच्या न्यायालयात त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@