म्हाडाची ऑनलाइन नोंदणी सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |


 


मुंबई: 'म्हाडा'च्या १,३८४ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून आजपासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने सर्वसामान्यांचा हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झाला आहे. आजपासून ते १० डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता घरांची सोडत निघणार आहे.

 

चांदिवली, पवई येथील घरे सर्वात कमी किंमतीची म्हणजेच १४ लाख ६१ हजार रुपयांची असली तरी कंबाला हिल, ग्रँट रोड येथील घरे तब्बल पाच कोटी ८० लाख रुपयांची आहे. म्हाडाने यंदा घरांच्या किमतीमध्ये २५ ते ३० टक्के घट केली आहे. म्हाडा लॉटरीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या महागड्या किमतीच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे.

 

विभागानुसार सदनिकांच्या किंमती पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. प्रत्येक वर्गवारीतील घरांची क्षेत्रफळानुसार किंमत कळेल. यामध्ये उच्चं उत्पन्न गटासाठी ६० लाख आणि त्यापेक्षा जास्त किंमत असली तरी सर्वात महागडे घर हे ५.८० कोटींची आहे. मागील वर्षी या गटातील घराची जास्तीत जास्त किंमत १ कोटी एवढी होती.

 
 
 

उत्पन्ननुसार वर्गीकरण

 

-उत्पन्न गट मासिक उत्पन्न मर्यादा (रु.)

-अत्यल्प उत्पन्न गट २५ हजार

-अल्प उत्पन्न गट २५,००१ ते ५० हजार

-मध्यम उत्पन्न गट ५०,००१ ते ७५ हजार

-उच्च उत्पन्न गट ७५,०००१ व त्यापेक्षा जास्त

 
 

घरांची किंमत

 

-उत्पन्न गट विक्री किंमत (रु.)

-अत्यल्प उत्पन्न गट २० लाख वा त्यापेक्षा कमी

-अल्प उत्पन्न गट २० ते ३५ लाखांपर्यंत

-मध्यम उत्पन्न गट ३५ लाख ते ६० लाखांपर्यंत

-उच्च उत्पन्न गट ६० लाख वा त्यापेक्षा जास्त

 

उपलब्ध घरे

उत्पन्न गट घरांची संख्या

 

-अत्यल्प उत्पन्न गट ६३

-अल्प उत्पन्न गट ९२६

-मध्यम उत्पन्न गट २०१

-उच्च उत्पन्न गट १९४

 

घरांची स्थिती

 

- बांधकाम चालू असलेल्या घरे : १,११२

- विखुरलेल्या घरे : २७२

- रेरा प्रमाणपत्रप्राप्त घरे : १,११२

- ओसीप्राप्त घरे : २६३

- ओसीची कार्यवाही प्रगतीपथावर असणाऱ्या घरे : ९

 

घरांची संख्या

विभाग घरे

 

-अँटॉप हिल, वडाळा २७८

-प्रतीक्षानगर, सायन ८९

-गव्हाणपाडा, मुलुंड २६९

-पीएमजी, मानखुर्द ३१६

-सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.) २४

-महावीर नगर, कांदिवली (प.) १७०

-तुंगा, पवई १०१

-दुरुस्ती मंडळ व पुनर्रचना मंडळ ५०

-विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्राप्त १९

-विखुरलेल्या घरे ६८

 

विविध प्रवर्गांसाठी घरांचे आरक्षण प्रमाण

प्रवर्ग आरक्षण (टक्के) उपलब्ध घरे

 

-एससी ११ १५७

-एसटी ६ ८७

-एनटी १.५ २२

-डीटी १.५ २१

-पत्रकार २.५ ३६

-स्वातंत्र्यसैनिक २.५ ३६

-अंध व अपंग ३ ४३

-संरक्षण दल २ २८

-माजी सैनिक ५ ७०

-आजी-माजी आमदार व खासदार २ २६

-म्हाडा कर्मचारी २ २८

-राज्य सरकारी कर्मचारी ५ ७०

-केंद्र सरकारी कर्मचारी २ २८

-कलाकार २ २८

-सर्वसामान्य ५० ७०४

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@