मनपा सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
 
 
जळगाव, 4 नोव्हेेंबर - येथील विजयेंद्र फाउंडेशन - विकास संघ आणि श्री अरिहंत मार्गी महिला मंडळ, महानगरपालिका यांच्यातर्फे मनपा सफाई कामगारांसाठी बालगंधर्व खुले नाट्यगृहात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात 400 कामगारांची तपासणी करून त्यांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले.
 
 
शिबिरात आ.सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, चंद्रहास पाटील, आनंद नन्नवरे, नावेद शेख, वाल्मीक सपकाळे, कौशिक खाटीक, अफजल शेख, जितेंद्र सैंदाणे, नंदकिशोर कुळकर्णी, किशोर साखला यांचे सहकार्य लाभले.
 
शिबिरासाठी डॉ. तुषार बोरोले. डॉ.सई नेमाडे, दंतवैद्यक डॉ.सागर चौधरी, डॉ. पंकज पाटील, डॉ. भूषण चव्हाण, डॉ.मेघना नारखेडे, डॉ. नीलम किनगे तर फिजिशियनमध्ये डॉ. राजेंद्र भालोदे, डॉ. रजनी नारखेडे, डॉ. पराग चौधरी, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. अभिषेक फिरके, डॉ. निखिल पाटील आदी डॉक्टरांचे सहकार्य लाभले. तसेच नितीन चौधरी, निलेश मदानी, नावेद शेख, अर्चना माळी यांनी अर्थ सहाय्य केले.महिला मंडळातर्फे कामगारांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
 
 
त्यात सुनंदा साखलाजी, आशा कावडिया, ललिता श्रीश्रीमाळ, आशा पगारिया, सुरेखा चोपडा, प्रेमलता डागलिया, ज्योती ललवाणी यांचा सहभाग होता. रेडिओलॉजिस्ट डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ.शिल्पा चिरमाडे, डॉ.सुनील पाटील यांनी विनामूल्य सोनोग्राफीसाठी पाठविण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@