चाळीसगाव शहराची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
नगरपालिका शताब्दी महोत्सवात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

 
 
चाळीसगाव, 4 नोव्हेंबर - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून शहरात नव्याने होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना तसेच येत्या तीन महिन्यात उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच प्रस्तावित भुयारी गटार योजनेमुळे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
 
 
सर्वप्रथम पालिकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण व पाणीपुरवठा योजना भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पालिकेच्या प्रवेशद्वार जवळ सायंकाळी 7 वाजता करण्यात आले. यानंतर पालिकेच्या मालकीच्या नवीन जेसीबी व पंधरा घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
 
 
ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, नगरपरिषदेचा हा शताब्दी महोत्सव भावस्पर्शी आहे. येथील अनेक लोकांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक आहे.
 
 
पाणी, शेती याबरोबरच रस्त्यांना आज खूप महत्त्व आहे. यासाठी रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वदूर रस्त्यांची कामे सुरू आहेत.
 
चाळीसगाव तालुक्यात महात्मा फुले आरोग्य संकुल, शासकीय ग्रामीण रुग्णालय, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी पूर्ण झाली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
 
 
वरखेडी-लोंढे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हा लवकरच पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून शेतीलाही याचा लाभ होणार आहे.
 
 
गिरणा नदीवर 7 बलून बंधारे लवकरच पूर्ण करण्यात येतील. नदीजोड प्रकल्प झाला तर पश्चिम भागातील नद्यांचे पाणी आपल्या भागात आणता येईल. या प्रकल्पामुळे आपल्या भागाचा विकास होऊन हे नंदनवन होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
नागरिकांची डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांपासून मुक्तता होण्यासाठी भुयारी गटारींचा डीपीआर त्वरित तयार करून सादर करावा. त्यास लागणारा संपूर्ण निधी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
 
 
आ. उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पं.स. सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, जि.प.सभापती पोपट भोळे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 
मु्ख्याधिकारी मानोरकर यांनी प्रास्ताविकात पालिकेच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे, त्या सर्वांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
दीर्घ अनुभवापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व
 
 
मंत्री गिरीशभाऊ राजकारणात आपण माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत. मात्र, तरीदेखील तुम्ही जलसंपदामंत्री आहात, याला शेवटी नशीबच लागते, अशी कोपरखळी भाजपचे पालिकेतील गटनेते राजेंद्र चौधरी यांनी मारली.
 
या वक्तव्याचा धागा पकडत मंत्री महाजन यांनी राजकारण किंवा अन्य क्षेत्रात फक्त नशिबावर अवलंबून राहून चालत नाही. तर तसे कर्तृत्वही असावे लागते. त्यासाठी अंगात प्रामाणिकता हवी, निष्ठा हवी. राजकारणातील दीर्घ वर्षांच्या अनुभवापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@