गुरांची अवैध वाहतूक; 45 जनावरांना जीवदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
मध्य प्रदेशातून सुरू असते महाराष्ट्रात वाहतूक
 
 
 
मुक्ताईनगर - तालुक्यातील पुरनाड सीमा शुल्क तपासणी नाक्यावरून टोल पावती फाडून मुक्ताईनगरकडे येणार्‍या कंटेनरमधून गुरांची अवैध वाहतूक सुरू होती.
 
 
काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही वाहतूक उघड झाल्याची घटना 3 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेच्या सुमारास टोल प्लाझापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर पुरनाड फाट्याजवळ घडली. यावेळी संतप्त जमावाने कंटेनरच्या काचा व लाईट फोडले.
 
 
कंटेनर क्र. आर जे. 9, जी सी.2861 या टाटा कंपनीच्या व शिवगणपती लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड, डाक पार्सल असे लिहिलेला बंदिस्त कंटेनर मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड चेक पोस्ट आला. येथे चालकाने नियमानुसार टोल पावती फाडली.
 
 
यानंतर हा कंटेनर पुढे मुक्ताईनगरकडे येत असताना सुरक्षा रक्षकाला संशय आला. यानंतर त्याने लागलीच उपप्रादेशिक अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यांनी पाठलाग करून टोल प्लाझापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर संशयास्पद कंटेनर अडवला.
 
 
पथकाला पाहून कंटेनर चालक व क्लीनरने धूम ठोकली. दरम्यान, घटनास्थळी गर्दी जमल्याने कंटेनरचा मागील दरवाजा उघडून पाहण्यात आला. त्यात दोन कप्प्यांमध्ये दोरखंडाने बांधून गुरांना कोंबल्याचे समोर आले. त्यापैकी 45 गोर्‍हे जिवंत, तर 5 दगावली होती.
 
 
तत्पूर्वी, कंटेनर उघडताच काही जनावरांनी सैरावैरा पलायन केले. हा प्रकार समोर येताच प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने कंटेनरच्या काचा व लाईटदेखील फोडले.
@@AUTHORINFO_V1@@