निराधार विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
रोटरी ईस्टचा उपक्रम
 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - विविध सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणार्‍या रोटरी जळगाव ईस्टतर्फे शिव कॉलनीस्थित लीलाई बालसुधारगृहात दिवाळी साजरी करण्यात आली.
 
 
रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष रजनीश लाहोटी, मानद सचिव प्रकाश कोठारी, प्रोजेक्ट चेअरमन गोविंद वर्मा व मान्यवर उपस्थित होते. आयडीएचे डॉ. मयूर जैन, डॉ. राहुल भंसाळी, डॉ. अर्चना कोतकर यांनी मार्गदर्शन केले. मुलांना टूथ पेस्टसह एक गिफ्ट कीट भेट देण्यात आले. यात स्टेशनरी, नवीन कपडे, मिठाई, फटाके यांचा समावेश होता. संजय गांधी यांनी सूत्रसंचालन केले तर विजय लाठी यांनी आभार मानले.
 
 
राजीव बियाणी, सुनील शहा, संजय गाधी, संजय शहा, भरत पटेल, वल्लभ अग्रवाल, महेश खटोड, डॉ. राहुल भन्साळी, सचिन खडके, सचिन जेठवाणी, अमृत पटेल,प्रितेश चोरडिया, प्रीती चोरडिया, अर्चना कोतकर, जिग्नेष वेद, राजेश साखला, प्रोजेक्ट चेअरमन गोविंद वर्मा, भावेश शहा, विजय लाठी उपस्थित होते. रोटरी जळगाव ईस्ट स्पोर्ट्स कमिटीसह अब्दुल मकरा, सचिन जेठवाणी यांचेही विशेष सहकार्य लाभले. शुभेच्छा देऊन समारोप झाला.
@@AUTHORINFO_V1@@