डांभुर्णीत मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
 
 
डांभुर्णी, ता.यावल - बर्‍याच दिवसांपासून मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. आमदारांसह सा.बां.विभागाच्या अधिकार्‍यांनीसुद्धा रस्ता पाहणी केली.
 
मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसून काम ठप्प पडल्याने रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ग्रा.पं.चे याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याची नागरिकांची ओरड होत आहे.
 
 
मुख्य रस्त्यावरील चौधरीवाडा, कोल्हेवाड्यामधील गटारी तुडुंब भरल्याने त्याचे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने पायी चालणेही अवघड झाले आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी असल्याने नागरिकांची जळगावला दिवाळीच्या खरेदीसाठी जावे लागत असल्याने या मुख्य रस्त्यावरून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने मनस्ताप होत आहे.
 
 
मात्र, येथील सत्यता पाहण्यास कुणीही तयार नसल्याने गावात समस्या वाढत आहे.काही भागात साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली असून आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे गाव मोठं लक्षण खोटं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उपाययोजना करण्याची गरज आहे.
राजकीय पदाधिकार्‍यांची चुप्पी का ?
 
 
या मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहनधारक साचलेल्या चिखलातून गाडी चालवित असून गाडी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. या प्रकाराकडे सा.बां. विभागासह ग्रा.पं.ला सोयरेसूतक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत असून यावल तालुक्यातील बरेच राजकीय पदाधिकारी सकाळ-संध्याकाळ याच रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र, या रस्त्याबाबत सर्वांनी चुप्पी धरली आसल्याने लहान वाहनधारक व सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
@@AUTHORINFO_V1@@