उपसरपंचाच्या वाढदिवसाच्या खर्चात वंचितांना दिवाळीचा फराळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |

 
धरणगाव - तालुक्यातील कल्याणेहोळ येथील उपसरपंचांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीत समाजातील वंचित घटक, कामगार यांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
 
आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी खर्च करावा, या भावनेतून कल्याणे होळचे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून शेतात, वस्ती करून राहणार्‍या कुटुंबीयांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ वाटप केला.
 
 
या निमित्ताने लहान मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात तालुक्यात कल्याणेहोळ येथील युवा पिढी अग्रेसर असते.
 
उपसरपंच राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही खर्च हा समाजोपयोगी कामासाठी करावा, समाजातील वंचित घटकांसाठी काम करावे, असा विचार सरपंच रमेश पाटील यांनी युवकांना सांगितला. युवक वर्गाने कल्याणेहोळ परिसरात शेतात, वस्ती करून राहणार्‍या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना दिवाळीचा फराळ वाटप केला.
@@AUTHORINFO_V1@@