पहूरच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
 
पहूर, 4 नोव्हेंबर - आपण समाजाचे एक देणे लागतो, या कृतार्थ भावनेतून पहूरच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेने खर्चाणेवाडी (ता.जामनेर) आणि राजेश्री कोटेक्स जिनिंगवरील 70 गोरगरीब महिलांना साड्या व फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले.
 
 
महात्मा फुले यांच्या समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करीत फटाके न फोडता बचत झालेल्या पैशातून तसेच संचालक मंडळ व शिक्षकांनी योगदान देत वाडीवस्तीवरील गोरगरीब कुटुंबीयांसोबत दिवाळी सण साजरा केला. फटाके फोडून मिळणार्‍या आनंदापेक्षा गोरगरिबांच्या चेहर्‍यावरील आनंद मोठा असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी व्यक्त केली.
 
 
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. संस्थेचे सचिव भगवान घोंगडे, संचालक लक्ष्मण गोरे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर, शिक्षिका माधुरी बारी यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
संचालक शंकर घोंगडे, समाधान पाटील, रामभाऊ बनकर, ग्रा.पं. सदस्य अर्जुन लहासे, रंगनाथदादा पाटील, मुख्याध्यापक अजय देशमुख आदी उपस्थित होते. हरिभाऊ राऊत, बी.एन. जाधव, अमोल क्षीरसागर, सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@