डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मिशन २०२०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |


 


इंदू मिल येथील स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या २० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामुळे मुंबईची नवीन ओळख तयार होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक व्यक्तीमत्व आहे. बाबासाहेबांना सर्व विषयाचे ज्ञान होते. त्यांनी मानवता, बंधुता, समतेचा पुरस्कार करणारा धम्म दिला. या विचारांवर आधारित सर्वसमावेशक अशी राज्यघटना त्यांनी देशाला दिली. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध्‍ा करुन देण्यात येतील. तसेच २०२० नंतर आंबेडकर अनुयायांना रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी इंदू मिल येथील नव्याने होणाऱ्या स्मारकात कायमस्वरूपी सोयीसुविधा निर्मण करण्यात येतील."

 

नागपूर येथील दीक्षाभूमीसाठी दिलेल्या भरगोस निधीचा देखील त्यांनी येवेळी उल्लेख केला. ते म्हणाले, "नागपूर येथील दीक्षाभूमीसाठी १०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी ४० कोटींचा निधी देण्यात आला आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी व मुंबईतील आंबेडकर स्मारक येथे जगभरातीलअनुयायांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील." तसेच मुंबईतील चैत्यभूमी व कुपरेज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कायमस्वरुपी भीमज्योतीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@