जळगावचे अमित मनोरे यांचे ‘स्टार्टअप इंडिया’त यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 4 नोव्हेेंबर - देशात नवउद्योजक तयार व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ची सुरुवात केली. स्टार्टअप या यात्रा उपक्रमात राज्यातील 309 आयडिया ग्रँड फायनलकरीता निवडण्यात आले असून जळगावचे अमित मनोरे यांची तंत्रज्ञान क्षेत्रात द्वितीय क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
राज्यात स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटीकडून स्टार्टअप महाराष्ट्र यात्रा 3 ऑक्टोबरपासून सुरू आहे. त्यात राज्यातील पाच हजारांपेक्षा जास्त नवीन उद्योजक सहभागी झाले होते.
 
ही यात्रा राज्यातून 13 व 15 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे दाखल झाली. त्यात 300 च्यावर उद्योजक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@