किल्ला स्पर्धेतील सर्वच किल्ले उत्कृष्ट : डॉ.अग्रवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
आशा, युवाशक्ती फाउंडेशनच्या किल्ला स्पर्धेचे उद्घाटन
 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - आशा फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन आयोजित किल्ला बनवा स्पर्धेतील प्रत्येकाने बनविलेला किल्ला वेगळा असणार. त्यामुळे प्रत्येक किल्ला उत्कृष्टच असणार आणि त्यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे प्रतिपादन रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी केले. किल्ला बनवा स्पर्धा व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
 
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सौ. सीमा भोळे, बळवंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील, युवाशक्तीचे पालक जितेंद्र छाजेड, शिव प्रतिष्ठानचे आकाश फडे, प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
मनोगतात डॉ. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या किल्ल्याची माहिती लिहावी तसेच इतरांनाही प्रेरणा द्यावी, असे आवाहनही केले. गिरीश कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी मातीशी खेळावे, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, आपल्या इतिहासाबद्दल प्रबोधन व्हावे व त्याबद्दल अभिमान जागरूक व्हावा यासाठी गेल्या 4 वर्षांपासून आपण ही स्पर्धा घेत आहोत, असे सांगितले.
 
 
सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर मनोगतात महापौर सीमा भोळे यांनी आपण चांगले किल्ले बनवित आहात. स्पर्धा असल्याने सर्वांनाच बक्षीस मिळेल असे नाही, मात्र ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांनी नाराज न होता पुढच्या वर्षी अधिक तयारीने भाग घ्यावा, असे आवाहन केले. मधुकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
आकाश फडे यांनी शिवरायांचे प्रेरणा स्तोत्र म्हणवून घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन व्यवस्थापिका सुजत बोरकर यांनी केले.
 
 
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आशा फाउंडेशनचे मधुकर पाटील, धीरज पाटील, सौ. वसुधा सराफ, सौ. माधुरी पुंडे तर युवाशक्तीचे विराज कावडीच्या, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, मनजीत जांगीड आदी परिश्रम घेत आहे. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@