जलसंपदामंत्री करतात ‘पाण्यात’ राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
पाचोर्‍याचे उपनगराध्यक्ष शरद पोटेंचा पत्रकार परिषदेत आरोप

पाचोरा, 3 नोव्हेंबर - शहराची संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे पाचोरा-भडगाव नगरपालिका मागील महिन्यापासून पत्रव्यवहार आणि निवेदनांव्दारे मागणी करीत आहे.
 
मात्र, या मागणीकडे जलसंपदामंत्री पाण्यात राजकारण करून आमदार किशोर पाटील कसे अडचणीत येतील या दुष्ट हेतुने आवर्तन सोडण्यास अडचणी निर्माण करीत असल्याचा जाहीर आरोप न.पा. उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केला आहे.
 
 
यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी दुजोरा दिला. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ओझर के.टी.वेअरमध्ये ठणठणात व शून्य जलसाठा आहे. पाणीच नसल्याने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा 15 ते 20 दिवसांत पाणी पुरवठा करावा लागत आहे
 
 
. पाणी टंचाई निर्माण झाल्याने पाचोरा-भडगाव न.पा.च्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना वेगवेगळे निवेदनाद्वारे गिरणेचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. जिल्ह्यात सर्वत्र निर्माण पाणी टंचाई निवाराणार्थ व आवर्तन सोडण्यात संदर्भात मंत्रालयात दि. 16 ऑक्टोबरला जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार होती.
 
 
मात्र मंत्री महाजन यांना वेळ नसल्याने ही महत्वपूर्ण बैठक झाली नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही 17 ऑक्टोबरला आवर्तनाबाबत बैठक होती. या बैठकीला मंत्र्यांना वेळ नसल्याने ही बैठकही रद्द करण्यात आली होती. एकीकडे जलसंपदा मंत्री पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, येथे आवर्तन देण्यासाठी आग्रही आहेत. आणि आवर्तन सोडण्यास व निर्णय घेण्यास कागदोपत्री घोडे नाचवून अडचणी निर्माण करीत आहे.
बहुळाच्या योजनेचे श्रेय माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे
 
 
न.पा.ने आवर्तनाबाबत निवेदन दिलेले असताना जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत विश्वासू म्हणुन मिरविणार्‍या सत्ताधारी युवा नेतेला पालकमंत्र्यांना आवर्तन सोडण्याचे निवेदन देण्याचे काय गरज होती. त्यांना जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात एवढा पुळका आला होता. तर ते जलसंपदामंत्र्यांना आवर्तन सोडा असे सागु शकले असते.
 
तसेच मागील काळात बहुळा वरून साडेसहा कोटीची तातडीची पाणी पुरवठा योजनेचे सर्व श्रेय माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचे आहे. हे शिवसेना मान्य करते. जलसंपदामंत्र्यांचे यात कवडीचेही योगदान नाही. त
 
सेच उतावळीचे पाणी बहुळेत सोडावे या मागणीकडे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहे. आवर्तना बाबत अमोल शिंदे हे सुद्धा राजकारण करीत असल्याचा संशय येतो.
 
हा त्यांचा पोरकटपणा असुन आमदारांना सल्ला देणार्‍या व सूर्यावर थुंकण्याची भाषा वापरण्यानी आपण कुठे कुठे थूंकलो आहे याचे आत्मपरीक्षण करावे .
@@AUTHORINFO_V1@@