शिक्षणातही समानतेशिवाय सर्वांगीण विकास नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांचे मत

 
 
पहूर, 3 नोव्हेंबर- शिक्षणातही समानता आल्या शिवाय सर्वांगीण विकास साधणेतसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शक्य होणार नसल्याचे मत वाकडी केंद्राच्या शिक्षण परिषदेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले.
 
 
शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासकीय विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. महिनाभरात केलेल्या शाळा भेटीत चांगल्या बाबीत शिक्षकांचे कौतुक करीत सुधारणा योग्य बाबतीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जितेंद्र पालवे हे होते. प्रास्तविक विजय पाटील यांनी केले.
 
 
केंद्रातील अकरा शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य तयार करून घटक निहाय प्रभावी अध्यापन कसे करावे या बाबत सोपान पारधी, निता पाटील, जयश्री पाटील, श्रीमती निकम यांनी चर्चेत सहभाग घेतला.
@@AUTHORINFO_V1@@