शिक्षण संस्था संघटनेच्या पुकारलेल्या राज्यव्यापी शाळा बंदमध्येपाचोरा तालुका शिक्षण संस्थाही सहभागी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
पाचोरा - महाराष्ट्र राज्य शिक्षण शिक्षण संस्था प्रसारक संस्था सहभागी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात पाचोरा तालुका शिक्षण प्रसारक संस्था पाचोरा या अंतर्गत येणार्‍या सर्व माध्यमिक शाळा पूर्णपणे संस्थाचालकांनी बंद ठेवल्या.
 
 
या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनासाठी माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांनी देखील सहभाग नोंदवला आहे. त्या अनुषंगाने श्री गा. से. हायस्कूल येथील सर्व कर्मचारी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पूर्णपणे 100% शाळा बंद आंदोलनात सहभागी होते.
 
प्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, संचालक सतीश चौधरी, शशी चंदिले हे गो.से. हायस्कूल येथे येऊन या संस्थाचालकांनी शाळेच्या मुख्य दरवाजास कुलूप लावून शाळा बंद करून आंदोलनात सहभाग नोंदवला.
 
 
याप्रसंगी संजय वाघ व संस्थाचालकांनी उपस्थित कर्मचार्‍यांची आजच्या शाळा बंद आंदोलन संदर्भात माहिती दिली. ती संस्थेच्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
 
 
त्यामुळे आम्ही सर्व कर्मचार्‍यांनी संस्थेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था संघटनेने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी आहोत. शासनाने हा राज्यव्यापी बंदचा विचार करून संस्थाचालकांच्या मागणीचा विचार करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
@@AUTHORINFO_V1@@