मनपात स्वीकृत सदस्यांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
कैलास सोनवणे, मराठे, त्रिपाठी, चौधरी, अमर जैन यांचा समावेश

 
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - जळगाव महानगरपालिकेत भाजपाकडून कैलास सोनवणे, राजेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, महेश चौधरी तर शिवसेनेकडून भागचंद जैन (अमर जैन) यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
 
शनिवारी झालेल्या सभेत प्रभारी नगरसचिव सुभाष मराठे यांनी निवडप्रक्रीया वाचून दाखवली.सभेत आयुक्त चंद्रकांत डांगे, महापौर सीमा भोळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडीसाठी अनुमोदन माजी महापौर ललित कोल्हे तर सूचक म्हणून शिवसेनेकडून नितीन लढ्ढा हे होते.
 
 
स्विकृत सदस्यांची निवडीनंतर मनपा आवारात ढोल-ताशा वाजवत जल्लोश करण्यात आला. आयुक्त चंद्रकांत डांगे, महापौर सीमा भोळे तसेच इतर नगरसेवकांनी स्विकृत सदस्यांचे अभिनंदन केले.
 
नगरसवेक कैलास सोनवणे यांनी स्विकृत सदस्यांकडून ना.गिरीश महाजन, आ.ए.टी.नाना पाटील, आ.चंदूभाई पटेल, आ. सुरेश भोळे यांचे आभार व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@