जामनेर तालुका निवृत्त सेवासंघाची सर्वसाधारण सभा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
केकतनिंभोरा,ता.जामनेर- तालुका निवृत्त सेवासंघाची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच स्व.दा.शा.पाटील स्मृतीभवन जामनेर येथे जिल्हा संघाचे अध्यक्ष तु.म.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 
 
प्रमुख अतिथी जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष सदाशिव सोनवणे, उपाध्यक्ष धनराज सुर्यवंशी, सरचिटणीस वसंतराव चौधरी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष दयाराम गवळी, निरीक्षक विजयराव सागर, धुळ्याचे उपाध्यक्ष बन्सीलाल पाटील, जे.के.चव्हाण तसेच जिल्ह्यातील तालुक्यांचे संघाध्यक्ष उपस्थित होते.
 
या संघाचे एकूण 1528 सभासद आहे. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पं.ना.पाटील यांनी केले. 37 देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. 2017-18 एस.एम.जोशी पुरस्कारप्राप्त जामनेरचे तालुका कार्याध्यक्ष एल.टी.पाटील आणि चाळीसगावचे तालुकाध्यक्ष मधुकर अहिरे यांचा सत्कारही झाला.
 
2016-17 मधील निवृत्ती सेवा पुरस्कारार्थीचा भुसावळचे प्रभाकर माळी, चाळीगावचे बाबुराव सांगळे, चोपड्याचे सुदाम सोनवणे यांचा सत्कार झाला. परिसरात 3500 वृक्ष लावून त्यांचे संगोपन केल्याने वृक्षमित्र सुकदेव महाजन यांचाही सत्कार केला. सभासदांच्या 10-12 वीतील गुणवंत पाल्यांचाही गुणगौरव करण्यात आला.
 
 
सरचिटणीस ना.का.शिंदे, लिलाधर धांडे यांनी मागील इतिवृत्त वाचून अंदाजपत्रकास मंजूरी घेतली. बन्सीपाल पाटील, सदाशिव सोनवणे, एल.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तु.म.पाटील यांनीही विचार मांडले. सुत्रसंचालन पं.ना.पाटील तर आभार गावंडे सर यानी मानले.
@@AUTHORINFO_V1@@