आगामी निवडणुकीच्यादृष्टीने मतदान यंत्रांची चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |



ठाणे: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारआगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याला पाठवण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशिन्सची राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘आगेय भारत इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीकडून ठाणे जिल्ह्यासाठी १२ हजार ६५९ मतदान यंत्रे, सात हजार ३६१ नियंत्रण यंत्रे व सात हजार ३६१ व्होटर व्हेरिफाईबल पेपर ऑडिट मशिन्स पुरविण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

 

या प्राप्त झालेल्या सर्व मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बेल कंपनीच्या इंजिनिअर्समार्फत सुरू करण्यात आली आहे. या प्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फत सराव मतदान करण्यात येत असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी ठाणे जिल्ह्यामंध्ये सर्व मतदान केंद्रावर नव्याने प्राप्त झालेल्या आणि तपासणी केलेल्या या यंत्रणेद्वारे मतदान होणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवारास झाल्याची खात्री त्याच ठिकाणी करता येणार आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोळकर यांनी यावेळी या यंत्रांचे प्रात्यक्षिकही दाखविले.

 

राज्यामध्ये सर्वात जास्त मतदार नोंदणी

 

दरम्यान, मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची अंतिम तारीख संपली असून राज्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ठाणे जिल्ह्यात झाल्याची माहिती समोर आली. यावेळी तब्बल दोन लाख ७७ हजार ८७४ नागरिकांनी मतदार यादीत नव्याने नोंदणी केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@