मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतलेकौशल्य विकासाचे प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
 
 
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संगठन तर्फे आयोजित शहरातील नवी पेठ येथील अपंग सेवा मंडळ संचलित मुकबधिर विद्यालयातील रांगोळी शिबिराचा समारोप करण्यात आला. शिबीरात विद्यार्थ्यांना ग्रीटींग, पणती, रांगोळी, सजावटीचे प्रशिक्षण दिले.
 
 
कार्यक्रमाप्रसंगी माहेश्वरी महिला संगठनाच्या प्रदेशाध्यक्षा ज्योत्स्ना लाहोटी, सुविता चरखा, सुमती नवाल, स्नेहलता लाठी, उर्मिला झंवर, विजया लाहोटी, प्रथा, रमेशजी लाहोटी, शाळेच्या मुख्याध्यापिका तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
 
शहरातील नवी पेठ येथील मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी शिबीराचे आयोजन करण्यात आलेे होते. हे शिबीर 10 दिवस घेण्यात आले.
 
 
या शिबीरात कुमुदिनी नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या रांगोळ्या काढायचे शिकविले. त्यासोबतच ग्रिटींग कार्ड व दिप (पणती) सजावट करणे याचेसुद्धा प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे हा या शिबिराचे आयोजन करण्यामागील प्रमुख उद्देश होता.
 
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी फराळाचा आनंद घेतांना परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@