होळनांथेला सहा लाखांचा ऊस आगीत भस्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
 
धुळे : शिरपूर तालुक्यातील होळनांथे शिवारात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आगीत शेतकरी राजेंद्र अंबरसिंग राजपूत (वय 55) यांनी लावलेला ऊस जळून खाक झाला.
 
या घटनेत सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना काल गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी राजपूत यांच्या माहितीवरुन थाळनेर पेालिस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.
 
या घटनेमुळे शेतकर्‍याला आर्थिक झळ बसली आहे.
@@AUTHORINFO_V1@@