शिवसेनेच्या जि.प सदस्याची जिल्हा कारागृहात रवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
पाचोरा, 3 नाव्हेंबर - येथील पंचायत समिती धुडगूस प्रकरणी फरार असलेले आमदार निकटवर्तीय जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी धुडगूस घातला होता.
 
या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यातील काही आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर फैसला होणार होता पंरतु त्याआधीच खाकीने आपला हिसका दाखवला असता या गुन्ह्यातील पहीला आरोपी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील यांना अटक केली.
 
त्यांना पाचोरा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. तर दि. 29 रोजी या गुन्ह्यातील फरार आरोपी शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील यांना अटक करण्यात आली होती.
 
या गुन्ह्यातील फरार आरोपीमध्ये जिल्हा परिषद सदस्य तथा आ. किशोर पाटील निकटवर्तीय पदमसिंग पाटील यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री जळगाव एलसीबीने शिताफीने ताब्यात घेतले.
 
 
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे करीत आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींची माहिती तातडीने पोलिसांना द्या असे आवाहन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@