अवाजवी भाडे आकारल्यास तक्रार नोंदवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
प्रादेशिक परिवहन मंडळाचे आवाहन
 
 
 
धुळे, 3 नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतुकीच्या भाडे दरापेक्षा कमाल दीडपट प्रवासी भाडे देवून प्रवाशांनी खासगी बसद्वारे प्रवास करावा. त्यापेक्षा जास्त, अवाजवी भाडे मागणी केल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
 
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी म्हटले आहे, धुळे शहरातून पुणे, मुंबई, नागपूर व इतर शहरांकडे खासगी कंत्राटी बसद्वारे प्रवास करणार्‍या नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतुकीच्या भाडे दरापेक्ष कमाल दीड पट प्रवासी भाडे देवून प्रवास करावा.
 
त्यापेक्षा जास्त, अवाजवी भाडे मागणी केल्यास  नागरिकांनी तक्रार करावी. त्यानुसार सदर परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. भाडेदराची माहिती अशी (अनुक्रमे सेवेचा प्रकार, राज्य परिवहन भाडे प्रति टप्पा/6 कि. मी. रु., आसन क्षमता, प्रति बस/प्रति कि. मी. भाडे रु., कंत्राटी परवाना वाहनाचे प्रति बस/प्रति कि. मी. भाडे रु., राज्य परिवहन महामंडळाचे भाडे अधिक 50 टक्के धरुन या क्रमाने) : अवातानुकूलित : साधी, 6.30, 44, 46.20, 69.30. निमआराम, 8.60,39, 55.90, 83.85. असे आहे.
@@AUTHORINFO_V1@@