रनाळे कन्या शाळा दप्तराविना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
 
 
 
 
नंदुरबार, 3 नोव्हेंबर - तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा रनाळे येथे दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात आला.
 
 
दिवाळी सण जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांना आकाश कंदिलाचे जास्त प्रमाणात आकर्षण असते. त्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांकडून आकाशकंदिल तयार करुन घेण्यात आले. घोटीव कागद, कार्डशीट पेपर इत्यादीपासून आकाशकंदिल व शुभेच्छा कार्ड तयार करण्यात आले.
 
 
त्याचप्रमाणे प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला. फटाक्यांमुळे वायु, जल व ध्वनी प्रदुषण निर्माण होते. त्यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्या संकटांपासून वाचायचे असेल तर विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त व प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी केेले.
 
 
त्यानुसार आम्ही फटाके फोडणार नाहीत, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका उज्वला पाटील यांनी दिवाळीनिमित्त मुलींना फराळ व मेहंदी कोन वाटप केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा मुरकेवार, मंगेश वसावे आदींनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@