परिवर्तनतर्फे देशभक्तीचा नाट्य आविष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
 
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - 5 नोव्हेंबर हा दिन मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार, 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भाऊंचे उद्यान येथील एम्पि थियेटर मध्ये जननी जन्मभूमीश्च या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
 
 
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले त्या वीरांच्या वीर माता यांच्या मनाचा शोध घेत त्या वीरांचे स्मरण करणार हे नाटक आहे . देशभक्ती व बलिदान यामधून आपल्या स्वातंत्र्यलढ़याला उजाळा देणारं हे नाटक आहे .
 
लेखिका संगीता पवार यांच्या लेखणी मधून साकारलेलं हे सुंदर नाटक जळगावकर रसिकांना बघायला मिळणार आहे. या नाट्यप्रयोगा मध्ये मंजुषा भिडे प्रतिभा देशकर संगीता पवार सोनाली पाटील वैभवी नाखरे ,स्नेहा एकतारे ,केतकी पाठक या कलावंतांनी भाग घेतलेला आहे .
 
 
या नाटकासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनने एम्पि थिएटर उपलब्ध करून दिलेल आहे . हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असा आवाहन परिवर्तन चे पुरुषोत्तम चौधरी नारायण बाविस्कर होरील सिंग राजपूत वसंत गायकवाड, अभिजीत पाटील, रश्मी कुरंभट्टी, उदय सपकाळे, प्रतीक्षा जंगम, योगेश चौधरी, हर्षदा कोल्हटकर, मंगेश कुलकर्णी, विजय जैन, ज्ञानेश्वर शेंडे, राहूल निंबाळकर, मनोज पाटील, विनोद पाटील, सुदिप्ता सरकार, किशोर पवार, हर्षल पाटील यांनी केलेल आहे.
@@AUTHORINFO_V1@@