नगरदेवळ्यात बसस्थानकाचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
नगरदेवळा - नगरदेवळा हे 40000 हजार लोकवस्ती असलेले पाचोरा तालुक्यातील सर्वात मोठे गांव मात्र बस्थानक नसल्याचे वृत्तपत्रात अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर शनिवारी 3 रोजी येथे बसस्थानकाचे लोकार्पण झाले.
 
 
स्वामी समर्थ नगर चुंचाळे रोडवरील जागेत आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते तर जेष्ठ नागरीक काशिनाथ शिरुडे यांंच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, ग्राम शिक्षण समिती सचिव शिवनारायण जाधव, अरूण काटकर, मंगताई पवार, पं.स.सदस्या सुधाकर महाजन, प्रदीप परदेशी, राजेंद्र देवरे विभाग नियंत्रण जळगाव, पंकज महाजन, प्रल्हाद घुले, पाचोरा आगार प्रमुख देवेंद्र वाणी यांच्या उपस्थितीत बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा झाला.
 
गाव तेथे बस तसेच या तत्वाने प्रत्येक कर्मचार्‍यांनी आपण पगार घेतो तर उत्पन्न वाढण्याकडे लक्ष देऊन नागरीकाना सेवा द्यावी, असे विभाग नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी सांगितले.
 
 
नगरदेवळा-पाचोरेकर मंडळी मिळून चांगले काम केल्याचे दिलीप वाघ यांनी सांगितले. प्रसन्न संघवी, राधेश्याम अग्रवाल, माधवराव सिनकर या दात्यानी स्वखर्चाने जनसुविधासाठी बसस्थानक बांधून दिल्याने महाराष्ट्रातील पहीले स्थानक असून आगाराचेे गाड्या ग्रामीण भागाकडून वळविल्यास आपले उत्पन्न वाढेेेल असे आ.किशोर पाटील यांनी सांगितले.
 
माजी सरपंच नामदेव भावडू, ग्रा.पं. सदस्य कृष्णा सोनार, संदीप पाटील, सागर पाटील, ग्रामसेवक आर. एन.पाटील, प्रदीप परदेशी, राधेश्याम रोडीलाल अग्रवाल, प्रसन्न संघवी, मनोज टिबडेवाल, माधव सिनकर राकेश थेपडे , मुन्ना परदेशी, साई बहुउद्देशीय संस्था, शिवसेना, भाजपा, राष्ट्वादी,काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@