दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
110 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंतचे बॉक्स
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आताषबाजी केली जात असते. दरम्यान, शनिवारी बाजारपेठ गच्च भरलेली होती. फुले मार्केटमध्ये विविध दुकाने सजलेली होती. यावर्षी ग्राहकांकडून पर्यावरणपूरक फटाक्यांना अधिक पसंती दिली आहे.
 
 
दिवाळीत सर्वच जण दिवाळीत फटाके फोडून आताषबाजी करीत असल्याने दिवाळीमध्ये विविध प्रकारच्या फटाक्यांना मोठ्याप्रमाणात मागणी होत असते. यंदा बाजारपेठेत सुमारे 110 रूपयापासून ते 3 हजार रुपयापयर्ंतचे बॉक्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. यामध्ये लहान फटाक्यांपासून ते सुतळी, लक्ष्मी बाँब यासह आकाशात फुटणार्‍या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
 
  
शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या फटाक्यांमध्ये रॉकेट, फ्लॉवर पॉईंटमध्ये रंगीला बो बो, क्रॉकलिंग, मल्टी कलर पॉट, चक्करमध्ये 25 शॉट्स, 50, 100, 200 व 500 शॉट्स असे विविध प्रकारचे फटाके बाजारात विक्रीसाठी आले असून आकाशात उंच फुटणार्या व रंगेबीरंगी फटाक्यांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
 
 
शहरातील शिवतीर्थ मैदानावर फटाके विक्रेत्यांनी आपली दुकाने लावलेली आहे. त्याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये. यासाठी महापालिका प्रशासनाकडून त्याठिकाणी अग्निशामन बंब ठेवण्यात येत असतो. परंतु यंदा त्या दुकानांसमोर केवळ एक एक प्लास्टिकची पाण्याची टाकी भरुन ठेवली आली आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
स्वदेशी बनावटीच्या फटाक्यांची विक्री
 
शहरात ग्राहकांकडून फटाक्यांची खरेदी केली जात असतांना त्यांच्याकडून चिनी फटाक्यांची मागणी केली जात आहे. परंतु विक्रेत्यांनी यंदा देखील चिनी फटाके विक्रीसाठी ठेवलेले नसल्याने विक्रेत्यांनी चिनी बनावटीच्या फटाके विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ग्राहकांना नाईलास्तव भारतीय बनावटीचे फटाके खरेदी करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@